Video : आंबे तोडण्याची भयानक शिक्षा, अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण.. अंगावर फेकले मधमाशांचे पोळे - Laukaha police station area Madhubani
🎬 Watch Now: Feature Video
पाटणा ( बिहार ) : बिहारमधील मधुबनी येथून लहान मुलांवर अत्याचाराचा हा व्हिडिओ समोर आला आहे. माणूस जेव्हा सैतान बनतो तेव्हा तो कोणत्या थराला जातो, याचे चित्र बिहारमधील मधुबनीतून समोर आले आहे. दोन आंबे तोडल्याबद्दल एवढी मोठी शिक्षा होईल, असा विचार या चिमुरड्यांनी स्वप्नातही केला ( Two minors beaten for theft mangoes in Madhubani ) नसेल. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेत दोन्ही मुलांना बांधून बेदम मारहाण करण्यात आली. यादरम्यान मुले रडतच राहिली, आरडाओरड करत राहिली. एवढे करूनही बागेच्या मालकाचे समाधान झाले नाही तेव्हा त्याने मधमाशांचे पोळे मुलांच्या अंगावर ( beehives thrown on body in Madhubani ) घासले. दोन्ही मुले विनवणी करत असल्याचे व्हिडीओत दिसत आहेत. तरीही त्यांच्यावर मधमाशांचे पोळे फेकण्यात आले. या लहान मुलांच्या अंगावर कपडे नाहीत. मधमाश्या त्यांच्या अंगाला चिकटलेल्या दिसतात. व्हिडिओमध्ये काही महिलाही दिसत आहेत, त्या रडणाऱ्या मुलांकडे पाहून हसत आहेत. त्या मुलांचा दोष असा होता की, त्यांनी आंब्याच्या झाडाचे दोन आंबे तोडले होते. त्यांना हात बांधून मारहाण केली जात आहे. या दोन्ही निष्पापांच्या पाठीवर मध लावण्यात आला. मधाच्या सुगंधामुळे अनेक मधमाश्या मुलांच्या पाठीवर चावू लागल्या. मुलं मधमाश्यांच्या डंखापासून बचावाची याचना करत होती. लौकाहा पोलीस स्टेशन ( Laukaha police station area Madhubani ) हद्दीतील बासुदेवपूर गावातील ही घटना आहे. या घटनेबाबत लौकाहा पोलीस ठाण्याचे प्रभारी संतोषकुमार मंडल यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळाली आहे. व्हिडिओ उपलब्ध आहे. व्हिडिओवरून लोकांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. नोखा पोलीस ठाण्याचे अध्यक्ष म्हणाले की, वॉचमनच्या माध्यमातून व्हिडिओमधील व्यक्तींची ओळख पटवली जात आहे. ओळख पटल्यानंतर मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल.