Umesh Kolhe Murder Case : आमदार रवी राणा यांच्या उपस्थितीत उमेश कोल्हे यांना श्रद्धांजली - आमदार रवी राणा
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - अमरावती शहरातील औषधी विक्रेते उमेश कोल्हे यांना आज राजकमल चौक येथे कुंभार समाजाच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. 21 जून रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास उमेश कोल्हे यांची घंटी घड्याळ परिसरात हत्या करण्यात आली होती. नुपूर शर्मा यांची पोस्ट शेअर केल्यामुळे त्यांची हत्या झाल्याचे एनआयएच्या तपासात स्पष्ट झाले ( Umesh Kolhe Murder Case ) आहे. या प्रकरणात एकूण सात जणांना अटक करण्यात आली असून नऊ जणांची चौकशी एनआयएच्या वतीने केली जात आहे. कुंभार समाजाच्यावतीने उमेश कोल्हे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बडनेराचे आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) उपस्थित होते. मी आणि खासदार नवनीत राणा आणि आमचे सर्व कार्यकर्ते उमेश कोल्हे यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आहोत असे आमदार रवी राणा यावेळी म्हणाले. शनिवारी कोल्हे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करण्यात आले होते.