ETV Bharat / state

बनावट औषधांची रुग्णांना विक्री: आंतरराज्यीय टोळीचा सहभाग असण्याची शक्यता, ठाण्यात खळबळ - FAKE MEDICINE RACKET IN THANE

पुणे आणि नांदेडमध्ये बनावट औषधांचं रॅकेट उघडकीस आल्यानंतर आता ठाण्यातही बनावट औषधसाठा आढळून आला. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनानं छापेमारी करत औषधसाठा जप्त केला.

Fake Medicine Racket In Thane
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 3 hours ago

ठाणे : भिवंडी शहरातून बनावट औषधांची रुग्णांना विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अन्न व औषध प्रशासनानं एक कोटी 85 लाख रुपयांचा साठा जप्त केला असून ही औषधं अँटिबायोटिक (प्रतिजैविक) आहेत. या प्रकरणी औषध प्रशासन विभागाकडून नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. आंतरराज्यीय टोळी यामध्ये सहभागी असून त्यादिशेनं अन्न व औषध प्रशासनाचा तपास सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

नारपोली येथील गोदामामध्ये बनावट औषधसाठा : भिवंडीमधील नारपोली येथील गोदामामध्ये बनावट औषधांचा साठा असल्याची माहिती अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या औषधांचा साठा विक्रीस प्रतिबंधित केला. या औषधांचे नमुने तपासल्यानंतर ते बनावट आढळून आले. त्यानंतर पथकानं एक कोटी 85 लाख रुपयांच्या बनावट औषधांचा साठा जप्त केला. याप्रकरणात अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट औषधांची रुग्णांना विक्री : बनावट औषधांची विक्री रुग्णांनाही झाली आहे. या प्रकरणात आंतरराज्यीय टोळी कार्यरत असून त्यादिशेनं अन्न व औषध प्रशासनाचा तपास सुरू आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून बनावट औषधांप्रकरणी आठ गुन्हे दाखल झाले आहेत. या बनावट औषधांची सरकारी रुग्णालयांमध्येही विक्री झाल्याचं उघड झालं होतं. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागात मोठी खळबळ उडाली आहे. अन् व औषध प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी या प्रकरणावर लक्ष ठेऊन आहेत. दरम्यान बनावट औषध विक्रीचं रॅकेट जिल्ह्यात उघडकीस आल्यानंतर रुग्णांचेही चांगलेच धाबे दणाणले आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा :

  1. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात देखील बनावट औषधींचा साठा उघड, 1 लाख 23 हजार गोळ्या कारवाईसाठी सुपूर्द
  2. बनावट औषध प्रकरण; ठेकेदाराने पुरवलेल्या औषधांची ससून हॉस्पिटलकडून होणार तपासणी
  3. वाढत्या वयानुसार औषधं घेताना बाळगा सावधगिरी; होवू शकतात परिणाम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.