Video : बिहारमध्ये 'अग्निपथ'वरून अग्नितांडव.. ठिकठिकाणी जाळपोळ.. पहा संपूर्ण आढावा

By

Published : Jun 17, 2022, 1:39 PM IST

thumbnail
पाटणा : अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ आज तिसऱ्या दिवशीही बिहारमधील बक्सर, लखीसराय, समस्तीपूर, हाजीपूर, बेतिया, खगरिया आणि आरासह अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी रेल्वे ट्रॅकवर निदर्शने करत ( Bihar Agnipath Protest ) आहेत. बक्सर डुमराव रेल्वे स्थानकाच्या अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दिल्ली-कोलकाता रेल्वे मुख्य मार्ग ठप्प झाल्यामुळे अनेक गाड्या तासन्तास अडकून पडल्या होत्या. दुसरीकडे, लखीसरायमध्येही आंदोलक विद्यार्थ्यांनी विक्रमशीला एक्स्प्रेसच्या 10 बोगी पेटवून दिल्या. समस्तीपूरमध्ये आंदोलकांनी जम्मू तवी-गुवाहाटी एक्सप्रेस ट्रेन ( agnipath scheme violent protest ) पेटवली. व्हिडिओत पाहुयात काय आहे बिहारमधील आंदोलनाची परिस्थिती..

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.