Video : नादचं केलाय थेट! कौटुंबिक वादातून चक्क सासुरवाडीतच तरूण चढला विद्यूत टॉवरवर - सोनखेडा-भराडखेडा शिवार
🎬 Watch Now: Feature Video
जालना - कौटुंबिक वादातून एक तरुण थेट उच्च दाबाच्या वीज वाहिनीच्या टॉवरवर चढला आहे. सोनखेडा-भराडखेडा शिवारात ही घटना असून मंगेश शेळके असं या तरुणाचे नाव आहे. त्याने मद्यप्राशन केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याला टॉवरवरून खाली उतरवण्यासाठी गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण तो खाली उतरण्यास तयार नसल्यानं पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अद्याप हा तरुण टॉवरवर असल्याची माहिती सामोर येत आहे. पत्नी सोबत झालेल्या कौटुंबिक वादातून हा तरुण सासुरवाडीत येऊन टॉवरवर चढला असल्याची माहिती ग्रामस्थांनी माहिती दिली.