National Highway Jammed : पर्याय मार्ग वाहुन गेला, गडचिरोली -भामरागड राष्ट्रीय मार्ग तब्बल 10 तास ठप्प - पर्याय मार्ग वाहुन गेला
🎬 Watch Now: Feature Video
पर्याय मार्ग वाहुन गेल्यामुळे (The alternative route was carried away) गडचिरोली -भामरागड राष्ट्रीय मार्ग तब्बल 10 तास ठप्प (Gadchiroli Bhamragad National Highway was jammed) झाला होता. गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसापासून मुसळधार तर कधी जेमतेम पाऊस सुरु आहे. त्यामुळे गडचिरोली- भामरागड- आलापल्ली राष्ट्रीय मार्गावर कुमरगुडा जवळ नाल्यावर तात्पुरता माती टाकुन बनवलेला पर्यायी रस्ता पुर्णपणे वाहुन गेला. त्यामुळे भामरागड तालुका मुख्यालय सह जवळपास 60 ते 70 गावांची संपर्क तुटला. त्यामुळे प्रवाशांना 10 तास प्रतीक्षा करावी लागली.