Coal Trader: मला एकनाथ शिंदे बनवण्याचा प्रयत्न! छत्तीसगडच्या व्यापाऱ्याचा अजब खुलासा; पहा व्हिडिओ - BJP of trying to make me Eknath Shinde
🎬 Watch Now: Feature Video
रायपुर (छत्तीसगड) - छत्तीसगडचे कोळसा व्यापारी सूर्यकांत तिवारी यांनी रायपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन आयटी छाप्यांबाबत अनेक मोठे खुलासे केले आहेत. आयकर छाप्यांच्या आधारे सूर्यकांत तिवारी यांनी दावा केला आहे की, छत्तीसगडमधील सत्ता उलथून टाकण्याचे षडयंत्र रचले जात आहे. ( Suryakant Tiwari, a Coal Trader From Chhattisgarh ) त्यांनी हे सांगताना महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख केला आहे. ते म्हणाले की या प्रक्रियेत मला हाताशी धरून अक्षरशा: माझा एकनाथ शिंदे करण्याचा प्रयत्ना भाजप आणि आयकर विभागाकडून करण्यात येत आहे. "आयकर विभागाने माझ्यावर प्रचंड दबाव टाकला असून मी छाप्यात सीएम भूपेश बघेल यांच्या उपसचिव सौम्या चौरसिया यांचे नाव घ्यावे असा दम मला दिला आहे. पहा व्हिडीओ नक्की काय म्हणाले सुर्यकांत तिवारी -
Last Updated : Jul 10, 2022, 10:42 PM IST