Video : 'ही' व्यक्ती 40 वर्षांपासून खात आहे वाळू.. तरीही प्रकृती आहे एकदम ठणठणीत
🎬 Watch Now: Feature Video
बेरहमपूर ( ओडिशा ) : लहानपणी नकळत तोंडात वाळू घातली की आई मारायची आणि मग वाळू खाणे बंद व्हायचे. वाळू ही चांगली गोष्ट आहे की वाईट हे लहानपणी मुलांना कुठे कळणार? पण लहानपणापासूनची सवय तारुण्यापर्यंतही सुटली नाही आणि वयाच्या ६८व्या वर्षीही एक व्यक्ती वाळू खाण्याचा छंद जोपासत आहे, असे तुम्ही ऐकले आहे का? होय, आम्ही ओडिशातील एका व्यक्तीबद्दल बोलत आहोत. जो गेल्या 35-40 वर्षांपासून वाळू खात आहे. एवढेच नाही तर वाळू खाल्ल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटते, परंतु आजपर्यंत त्याला आरोग्याचा कोणताही त्रास झालेला नाही. हरिलाल सक्सेना (६८) असे या व्यक्तीचे नाव असून, तो उत्तर प्रदेशातील अरंगापूर येथील रहिवासी आहे. हरिलाल गंजाम जिल्ह्यातील लौडीगा पंचायतीच्या रंगेलुंडा ब्लॉक अंतर्गत कीर्तिपूर गावात वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करतो. जेवल्यानंतर किंवा जेवणापूर्वी मूठभर वाळू खात असल्याचे हरीलाल सांगतात. पावसाळ्यात ओली वाळू खाऊ नये म्हणून तो घरात वाळूची पोती ठेवतो. अशा प्रकारे वाळू खाण्याच्या सवयीमुळे काही स्थानिक लोकांनी त्याच्या शरीराच्या रचनेबद्दल आश्चर्य व्यक्त केले असून, हरिलालची वैद्यकीय चाचणी करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.