Kerala Vishu Slap festival : दे दणा दण ; केरळमध्ये एकमेकांना चापटा मारण्याची अनोखी स्पर्धा, पाहा व्हिडिओ - कन्नूर येथील माविलक्कावू मंदिर
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15074909-thumbnail-3x2-keral-news.jpg)
कन्नूर (केरळ) - भारत हा एक वैविध्यपूर्ण देश आहे. येथे वेगवेगळ्या भागात वेगवेगळे सण-उत्सव, महोत्सव हे साजरे होतात. असाच एक विशू महोत्सव हा केरळमधील कन्नूरमध्ये साजरा करण्यात ( Kerala Vishu Slap festival ) येतो. या केरला विशू उत्सवाचे वेगळेपण म्हणजे येथील अनोखी असलेली चापटा मारण्याची स्पर्धा होय. होय येथे दोन पहेलवान हे आपल्या प्रतीस्पर्ध्याला बेदम चापटा ( Vaishu Festival in Kerala ) मारतात. प्रत्येकजण हा विजयश्री खेचून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न ( slapping contest in kannur Kerala ) करतो. या विशू महोत्सवाचे आयोजन कन्नूर येथील माविलक्कावू मंदिरात करण्यात आले आहे. कोविड बंदीमुळे गेल्या दोन वर्षांपासून हा महोत्सव झाला नव्हता. यंदा पुन्हा हा महोत्सव सुरू झाल्याने स्पर्धा पाहण्यासाठी संपूर्ण केरळसह इतर राज्यातील लोकांची गर्दी केली होती.