श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे मुख्य मंदिरामधील गणेश कुंडात विसर्जन - श्रीमंत दगडूशेठ गणपती बातमी
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.. अशी प्रार्थना करत सनई चौघडयांच्या गजरात दगडूशेठ गणपतीचे मंदिरामधील विहिरीची प्रतिकृती असलेल्या गणेश कुंडात विसर्जन करण्यात आले. मंगळवारी अनंत चतुर्दशीला सायंकाळी ६ वाजून ४७ मिनिटांनी 'श्रीं'चे विसर्जन ट्रस्टच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने ट्रस्टच्या १२८ व्या वर्षी उत्सवात इतिहासात पहिल्यांदाच 'श्रीं'चे विसर्जन व उत्सवाची सांगता मुख्य मंदिरात झाली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, हेमंत रासने, प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते. प्रख्यात सनई वादक प्रमोद गायकवाड व नम्रता गायकवाड यांनी गणरायाचरणी वादनसेवा अर्पण केली.