Shivrajyabhishek Ceremony Scene : करोडो रुपये खर्च करुन बनवलेल्या शिवराज्याभिषेक देखाव्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jun 6, 2022, 7:41 PM IST

ठाणे - छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस सर्वत्र झाला. मात्र ठाणे महानगर पालिकेच्या प्रशासनाला याचा विसर पडलेला पाहायला दिसत ( Thane Municipal Corporation Shivrajyabhishek Sohala Image ) आहे. महानगर पालिकेच्या मुख्यालयात करोडो रुपये खर्च करुन राज्याभिषेक सोहळ्याची प्रतिमा तयार करण्यात आली ( Thane Municipal Corporation Shivrajyabhishek ceremony scene ) आहे. मात्र या प्रतिमेचा विसर पडल्याने आज या प्रतिमेकडे दुर्लक्ष झाल्याने त्यावर धुळ जमा झाली आहे. त्यामूळे ठाणेकर नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन या प्रतिमेचे पूजन केले आहे. निवडणुका लागण्याच्या आधी घाई घाईमध्ये मोठा इव्हेन्ट करुन सत्ताधारी शिवसेनेने ठाणे महानगर पालिकेच्या मुख्यालयात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक असलेला देखावा उभारला. त्याची काही महिन्यातच धुळ जमा झाल्याने रया गेली आहे. आजच्या राज्याभिषेक दिनानिमित्त तरी त्याची साफसफाई देखील करण्यात आली नाही. त्यामूळे चिडलेल्या ठाणे नागरिकांनी स्वतःहून फुले टाकुन पूजन केले आहे. ठाणे महानगर पालिकेवर कार्यकाल संपला आहे. त्यामुळे आयुक्त हे प्रशासक आहेत. त्यामूळे प्रशासनाच्या हाती कारभार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून झालेले हे दुर्लक्ष नागरिकामध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. हा हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी नागरिक करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.