Aaditya Thackeray at Ayodhya : अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्यासाठी प्रयत्न करणार; आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा - Aaditya Thackeray Ayodhya Press
🎬 Watch Now: Feature Video
अयोध्या - शिवसेना नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर ( Aaditya Thackeray Ayodhya visit ) आहेत. यावेळी त्यांनी राम मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद ( Aaditya Thackeray Ayodhya Press ) साधला. यावेळी ते म्हणाले की, उत्तरप्रदेशात शिवसेनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ज्यांनी स्वागत केले. त्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. शिवसेनेना ही उत्तरदेशात शक्ती प्रदर्शनासाठी आलेली नाही, तर शिवसेनेची शक्ती आणि भक्ती या दोन्ही एकच आहेत. आमची भक्ती हीच शक्ती आहे. त्यामुळे आम्हाला शक्ती प्रदर्शन करण्याची काही गरज नाही. अयोध्येत मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून भाविक हे दर्शनासाठी येतात. त्यांना राहण्यासाठी आणि उत्तरप्रदेशातील मराठी भाषिक नागरिकांसाठी आम्ही महाराष्ट्र सदनसाठी अयोध्येत जागेची मागणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत पत्र व्यवहार करणार आहेत. जनतेला दिलेली वचनं पाळणं हे शिवसेनेचं हिंदुत्त्व, मुंबईत रामाच्या आशीर्वादाने रामराज्य येईल, असेही मंत्री आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.
Last Updated : Jun 15, 2022, 11:05 PM IST