Pratap Sarnaik गोविंदा असलेले मुख्यमंत्री दहीहंडी खेळाडूंच्या भल्यासाठी पुढं आले, प्रताप सरनाईक - प्रताप सरनाईक मराठी बातमी
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - दहीहंडी उत्सवासाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. दहीहंडी या खेळाचा समावेश साहसी क्रीडा प्रकारात करण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक मागील दहा वर्षापासून प्रयत्न करत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदा या खेळाचा साहसी क्रीडा प्रकारात समावेश केल्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर यंदा गोविंदांना दहा लाखाचे विमा कवचही देण्यात आले आहे. दहीहंडी दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी ही अगोदरच जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकेकाळी स्वतः गोविंदा होते. त्या कारणाने त्यांना त्यांची जाणीव आहे. त्यामुळे त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचं शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले mla pratap sarnaik on cm eknath shinde decision dahi handi आहे. याबाबत प्रताप सरनाईक यांच्याशी बातचीत केली आहे 'ईटिव्ही भारत'च्या प्रतिनिधीने.