Panhala Fort : पुरातत्व विभागा विरोधात संभाजी ब्रिगेडचे आंदोलन; प्रतिकात्मक खुर्ची, टेबल बुरुजावरून दिले फेकून - पुरातत्व विभागा विरोधात संभाजी ब्रिगेडचे आंदोलन
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15876542-1081-15876542-1658316607299.jpg)
कोल्हापूर - पन्हाळगडाची ( Panhala fort ) होत असलेली दुरवस्था आणि याकडे पुरातत्व विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड ( Sambhaji Brigade ) आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक पद्धतीने पुरातत्व खात्याच्या खुर्ची, टेबल आणि फाईल्स दुतोंडी बुरुजावरून फेकून दिले. शिवाय केवळ पत्रव्यवहार न करता काहीतरी ठोस निर्णय घ्या, अन्यथा कार्यालयातील खुर्ची टेबल फेकून देऊ, असा इशारा सुद्धा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला.