Gunratna Sadavarte : वकील गुणरत्न सदावर्ते पुन्हा अडचणीत.. 'या' प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी - सदावर्तेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 17, 2022, 9:32 PM IST

बारामती ( पुणे ) : सिल्व्हर ओक येथील हल्ल्याप्रकरणी ( Silver Oak Attack Case ) गुन्हा दाखल झालेले वकील गुणरत्न सदावर्ते हे पुन्हा एकदा अडचणीत आले ( Gunratna Sadavarte In Trouble ) आहेत. सदावर्ते यांनी त्यांच्या अल्पवयीन मुलीस गाडी चालविण्यास देऊन लोकांच्या जीवितास धोका निर्माण केला असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ( Demand To File FIR Against Sadavarte ) माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव ( RTI Activist Nitin Yadav ) यांनी केली आहे.एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात सध्या अटकेत असणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्या अवघ्या 12 वर्षाच्या मुलीच्या हातात चारचाकी वाहनाचे स्टेरिंग दिले आहे. ठाणे ते दादर मार्गावर हे वाहन चालवण्याचा व आपल्या अल्पवयीन मुलीला चालविण्यास प्रोत्साहन देत असल्याचा व्हिडिओ बारामतीतील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी ट्विट केला असून, याबाबत कारवाई करण्याची मागणी पोलीस महासंचालक व गृहमंत्र्यांकडे केली आहे. शिवाय सदावर्ते यांच्या अल्पवयीन मुलीने चालवत असलेल्या फॉर्च्यूनर गाडीचा इन्शुरन्स संपला असल्याने वाहन कायदा अधिनियमान्वये वाहन जप्त करण्याची मागणी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.