Vijayadashami 2022 आदिवासी बांधवानी उधळला रावण दहणाचा कार्यक्रम; म्हणाले रावण आमच्यासाठी पुजनीय... - Adiwasi in chandrapur

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 6, 2022, 10:36 AM IST

रावण हा आदिवासींचा पूजनीय महात्मा Ravana is revered Mahatma of the adiwasi असल्याने त्याचे दहन होऊ देणार नाही. अशी भूमिका घेत गोंडपिंपरी येथे रावण दहनाचा कार्यक्रम Ravana burning event आदिवासी बांधवांनी उधळून लावला. विजयादशमीनिमित्त परंपरा Traditions on the occasion of Vijayadashami म्हणून आज सर्वत्र रावण दहन केले जाते. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी येथेही रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला. त्यासाठी रावणाची दशमुखी प्रतिमा उभी करण्यात आली. मात्र या प्रतिमेचे दहन करण्यापूर्वीच आदिवासी बांधवांनी कार्यक्रम ठिकाणी येत दहनाचा विधी उधळून लावला. रावण हा वाईट प्रवृत्तीचे प्रतीक म्हणून त्याच्या प्रतिमेचे दहन केले जात असले तरी रावण हा आदिवासी समाजासाठी पूजनीय असून श्रेष्ठ शिवभक्त आहे. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेचे दहन करू नये अशी भूमिका अलीकडे सर्वत्र घेतली जात आहे. गोंडपिंपरी येथे घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली असून काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत अनर्थ टाळला.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.