Rajya Sabha Election Voting : राज्यसभा निवडणूक.. भाजप, काँग्रेसचे आमदार विधानभवनात दाखल - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - महाराष्ट्रातील ६ राज्यसभेच्या जागेसाठी आज निवडणूक होत ( Rajya Sabha Election Voting ) आहे. अतिशय महत्त्वाची असणाऱ्या या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागलेल आहे. भाजपने तिसरा उमेदवार ( BJP Candidate RS Election 2022 ) देऊन ही निवडणूक चुरशीची केली असताना या निवडणुकीत दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना प्रयत्नाची पराकाष्टा करत आहे. याविषयी विधान भवनाच्या परिसरात याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संजय पिळनकर यांनी. विधानसभेतून राज्यसभेवर ( Rajyasabha Election 2022 ) जाणाऱ्या सहा जागांसाठी आज ( 10 जून ) मतदान होत आहे. एकूण सात उमेदवार या निवडणुकीत आपले नशीब आजमावत असून, त्यापैकी सहाव्या जागेची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. ही जागा आपल्याकडे खेचण्यासाठी महाविकास आघाडी विरोधात भाजपाने जोर लावला आहे. मात्र, अपक्ष, इतर छोटे पक्षांच्या आमदारांची मते निर्णायक ठरणार असल्याने ते कोणाला मतदान करणार हे या निवडणूक प्रक्रियेनंतर समोर येणार आहे. राज्यसभेची निवडणूक रंगतदार आणि चुरशीची होईल असे सांगितले जात आहे मात्र, आम्हाला काही अडचण नाही आहे, पहिल्या फेरीमध्ये आमचे चारही उमेदवार जिंकतील असा विश्वास काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.