Patiala Violence : पंजाबमध्ये बाळ ठाकरे शिवसेना आणि खलिस्तानी समर्थक एकमेकांशी भिडले; पाहा व्हिडिओ - शिवसेना आणि खलिस्तानी समर्थक एकमेकांशी भिडले
🎬 Watch Now: Feature Video
पटियाला (पंजाब) (Patiala News) - पंजाबमधील पटियाला येथे दोन गटांमध्ये हिंसक हाणामारी झाली. दोन गटांमध्ये झालेल्या दगडफेकीमुळे परिसरात तणाव ( punjab patiala violence ) वाढला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही हाणामारी काली मातेच्या मंदिराजवळ ( kali mata mandir patiala ) झाली. वृत्तांवर विश्वास ठेवला तर बाळ ठाकरे शिवसेना आणि खलिस्तानी समर्थक एकमेकांशी भिडले. या चकमकीनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पंजाबमधील पटियाला येथे बाळ ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. यावेळी खलिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. यावरून अनेक शीख संघटना आणि बाळ ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते समोरासमोर आले. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांना खूप प्रयत्न करावे लागले. यावेळी दोन्ही बाजूंनी तलवारी उडाल्या आणि दगडफेक करण्यात आली.