Pune Traffic Police : देवदूत! ट्राफिक पोलिसांनी सांगितला अपघातानंतरच्या गोल्डन आवर्समधील थरारक अनुभव - गोल्डन आवर्समधील थरारक अनुभव

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 28, 2022, 3:31 PM IST

पुणे - राज्यात एकीकडे मशिदीवरील भोंग्याला घेऊन राजकारण करून राज्यात जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र एकीकडे असे असले तरी माणुसकी एकच धर्म.. हिंदू मुस्लिम भाई भाई असा संदेश देणारे आणि ते प्रत्येकशात आणणारे अनेक उदाहरणे आपला पाहायला मिळत आहे. असाच काहीसा प्रकार वारजे येथील पुलावर घडला आहे. खरा तो एकचि धर्म चा संदेश देत ट्राफिक पोलीस ( Pune traffic police ) समीर बागसिराज याने चिमुरडीला नवी संजीवनी दिली ( Pune Traffic Police Help Minor Girl ) आहे. या प्रकरणी वाहतूक पोलीस समीर बागसिराज सांगितले की, ही घटना 14 एप्रिलला सकाळी घडली होती. जेव्हा मी ते अपघात बघितला तर त्यात ती छोटी मुलगी पूर्णपणे अडकली होती. थोड्या प्रयत्नांनंतर ती बाहेर आली तर ती रडत होती. मी कोणताही वेळ न घालवता तिला खांद्यावर घेऊन सर्व्हिस रोडने खाली आलो आणि रिक्षा चालकाच्या मदतीने तिला रुग्णालयात घेऊन गेलो. पोलिसांना कोणतीही जात नसते. आणि अश्या परिस्थितीत जात बघितली जात नाही. मला उपवास असताना मी तिला माणुसकीच्या नात्याने वाचवलं आज तिच्या घरच्यांचा कॉल येत असून ते माझं आभार मानत आहे. असं यावेळी समीर ने सांगितलं. यावेळी वडील मनोज पुराणिक म्हणाले की जाती धर्म महत्त्वाचं नसून माणसाने माणसाशी माणसागत वागावे असे यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.