थरारक CCTV Video : आरोपीने 30 सेकंदात केले 35 वार, नाना पेठेत तरुणाचा चाकूने भोसकून खून - pune nana peth murder case
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - पुणे शहरातील मध्यवर्ती नाना पेठेतील नवा वाडा भागात सोमवारी मध्यरात्री पूर्ववैमनस्य आणि वर्चस्ववादातून एका तरुणाचा चाकूने भोसकून आणि डोक्यात सिमेंटचे ब्लॉक घालून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली होती. यात अक्षय लक्ष्मण वल्लाळ (वय २८, रा. नवा वाडा, नाना पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेत अवघ्या 30 सेकंदात आरोपींनी त्याच्यावर 35 वार केले. इतकेच नाही तर तो खाली पडल्यानंतर सिमेंटच्या ब्लॉकने त्याच्या डोक्यात वार केले. गंभीर जखमी झालेल्या अक्षयचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी समर्थ पोलीस स्टेशनच्या वतीने महेश नारायण बुरा, किशोर अशोक शिंदे(दोघेही रा. नाना वाडा, नाना पेठ) यांना अटक केली आहे. पहा सी.सी.टिव्ही फुटेज....