Prakash Ambedkar On Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदेंच्या बंडावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, कायदेशीर सगळी सुत्र उद्धव ठाकरेंच्या हातात जातील - महाराष्ट्र राजकारण अपडेट
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. या राजकीय गदारोळावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केले ( Prakash Ambedkar On Eknath Shinde ) आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपाने एकनाथ शिंदेंना घातली आहे का? महाराष्ट्रातील राजकारणात सत्ता पालटाचे चिन्हे आहेत का? शिवसेनेचा एवढा मोठा गट अचानक बाहेर पडणे हे महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळी दिशा देईल का? तसेच या बंडानंतर शिवसेनेसह इतर पक्षांची कशी भुमिका असेल. याबद्दल सविस्तर ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी बातचीत केली आहे. यावेळी ते म्हणाले की, एक उत्तर ध्रुवाला तर दुसरा दक्षिण ध्रुवाला आहे. त्यांनी एकत्र येऊन आपले म्हणणे मांडावे, शिवसेनेतून वेगळे होण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी कारवाई सुरू केलेली आहेत. मात्र त्यांनी स्वाक्षरी केली म्हणजे झाले असे नव्हे. याचे सर्व तपासणीचे अधिकार हे विधानसभेचे उपाध्यक्षांच्या हातात आहेत. मानसिकतेची तपासणी करण्याची उपध्याक्षांकडे असतो. त्यामुळे याची सर्व सुत्रे उद्धव ठाकरे यांच्या हातात जातील. त्यांना हवी असलेली 37 हा आकडा त्यांनी पार केला तरी कायदेशीर लढाई करावी लागेल. उद्धव ठाकरेंचे कालचे भाषण बरोबर होते. ( Prakash Ambedkar On Maharashtra Political Crisis )