VIDEO : संजय राऊतांच्या नागपूर सभेत वीजचोरी
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर :- नियम आणि कायदे हे फक्त सर्वसामान्यांनीचं पळाले पाहिजे का,असा प्रश्न विचारण्याची वेळ नागपूरसह राज्याच्या जनतेवर आली आहे. एकीकडे राज्यात वीजेचा तुटवडा निर्माण झाल्याने सर्वसामान्य जनतेला भारनियमनाचा शॉक बसत आहे. मात्र, दुसरीकडे राजकीय पक्षांच्या सभा आणि कार्यक्रमांमध्ये सर्रासपणे वीज चोरी केली जात असल्याचे प्रकार घडत आहे. काल दक्षिण नागपूर परिसराच्या गजानन नगर या ठिकाणी शिवसेना खासदार संजय राऊत यांची जाहीर सभा पार पडली. मात्र या सभेसाठी लागणारी वीज विजेच्या खांबावरून चोरण्यात आली होती. राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी कालच राज्यात भारनियमन अटळ असल्याचे विधान केले आहे. ज्या ठिकाणी वीज चोरी जास्त आहे, वीज बिलाची वसुली कमी आहे अशा ठिकाणी भारनियमन करावे लागेल असे ऊर्जा मंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला यंदाचा उन्हाळा वीज भारनियमनाच्या संकटासह काढावा लागणार आहे हे निश्चित आहे. मात्र,दुसऱ्या बाजूला राजकीय पक्षांच्या सभांमध्ये राजरोसपणे वीजचोरी सुरू असल्याचं दिसून येत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्याच्या सभेसाठी ऊर्जा मंत्र्यांच्या शहरातच वीज चोरल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर महावितरण आयोजकांवर कारवाई करेल का असा प्रश्न ही निर्माण झाला आहे.