Chalisgaon Police Dance : पोलीस निरीक्षक के.के.पाटील पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; पोलीस ठाण्याच्या आवारात धरला डीजेवर ठेका - चाळीसगाव पोलीस अधिकारी केके पाटील गाण्याच्या तालावर थिरकले

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jun 4, 2022, 6:06 PM IST

जळगाव - कीर्तन सुरु असताना नारदाच्या गादीवर पाय ठेवल्याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहराचे पोलीस निरीक्षक के.के.पाटील हे चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. हे प्रकरण कुठे थांबत असताना के.के.पाटील हे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे दिसत आहेत. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल ( 3 मे ) चाळीसगावचे पोलीस निरीक्षक के.के. पाटील आणि ठाण्यातील कर्मचाऱ्याचा वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पोलीस ठाण्याच्या परिसरात केके कापण्यासह गाण्याच्या तालावर के.के.पाटील आणि कर्मचारी नाचताना पाहायला मिळाल्याने चांगलीच खळबळ उडाली. पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा नाचण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. तर, नागरिकांमध्ये उलट, सुलट चर्चा होताना दिसत आहेत. या प्रकरणावर आता वरिष्ठ पोलीस अधिकारी काय पाऊल उचलतात हे पाहणे महत्वाचे ठरणार ( kk patil dance dj song his birthday in chalisgaon ) आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.