बळीराजासोबत एक दिवस : पिढ्यांन पिढ्या गेल्या मात्र, समस्या 'जैसे थे'! व्यथा चंद्रपूरच्या शेतकरी कुटुंबाची... - farmer
🎬 Watch Now: Feature Video
चंद्रपूर - जंगलालगत असलेल्या वांझोट्या जमिनीवर काबाडकष्ट करुन मशागत केली. जमिनीत घाम गाळून तिला पिकवण्यायोग्य करण्यासाठी त्यांच्या पिढ्यांन पिढ्या झिजल्या. मात्र, अजूनही या काळ्या आईच्या लेकरांना उपऱ्यासारखेच जीवन जगावे लागत आहे. ही व्यथा आहे चंद्रपूर जिल्ह्यातील अनिल लटारी गोयलसारख्या अनेक शेतकऱ्यांची...ज्यांनी या जमिनीसाठी आपले आयुष्य खर्ची घातले... त्याच व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय 'ईटीव्ही भारत'ने बळीराजा सोबत एक दिवस.. या उपक्रमातून..
Last Updated : Jun 27, 2019, 9:59 PM IST