बळीराजासोबत एक दिवस : सततच्या दुष्काळाने गवंड्याच्या हाताखाली राबतोय 'बळीराजा'; टाकळी खातगावच्या सोमनाथाची व्यथा - farmer
🎬 Watch Now: Feature Video

अहमदनगर - अपवाद वगळता बहुतांश वेळी पावसाच्या लहरीपणामुळे त्रासलेल्या शेतकऱ्यावर आता आपले शेत सोडून इतर ठिकाणी काम करण्याची वेळ आली आहे. शेतकऱयांना आपल्या मुलांना चांगल्या शिक्षण संस्थेत शिक्षण मिळावे, या माफक अपेक्षेवरही 'पाणी' सोडावे लागत आहे. सततच्या दुष्काळामुळे शेतात कोणतेही पीक येईना. त्यामुळे गोठ्यातील गाईंचे निघेल तेवढे दूध डेअरीवर घालायचे आणि मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नावर कसेबसे घर चालवण्याची वेळ बळीराजावर आली आहे. त्यातच चाऱ्याचा गहन प्रश्न आहेच. अशाच भीषण परिस्थितीचे वास्तव दर्शविणाऱ्या आणि बहुसंख्येने अल्पभूधारक असलेल्या शेतकऱ्यांचे वास्तव 'ईटीव्ही भारत'ने नगर तालुक्यातील टाकळी खातगाव येथील सोमनाथ पादिर या शेतकऱ्याच्या रुपाने प्रातिनिधिक स्वरूपात मांडले आहे. पाहुयात त्याचा सोबतचा एक दिवस...