Viral Video कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराजांच्या फोटोसमोरच अश्लीलपणाचा कहर - Intoxicated Dancing
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16115015-thumbnail-3x2-lllm.jpg)
कोल्हापूर शहरातील शुक्रवार पेठ परिसरातील एका मिरवणुकीत एक काही तरुणी आणि तृतीयपंथी नशा करीत डिजेच्या गाण्यावर धिंगाणा Young Woman Being Intoxicated and Dancing on Music घालत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे हा सर्व संतापजनक प्रकार छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराजांच्या फोटो समोर होत आहे यामुळे या व्हायरल व्हिडीओ अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. या व्हिडिओ विरोधात शिवसेना शहरप्रमुख रवीकिरण इंगवले Shiv Sena city chief Ravi Kiran Ingwale हे लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात Laxmipuri Police Station तक्रार दाखल करणार आहेत. डीजेच्या तालावर काही तरुणी चंद्रमुखी या गाण्याच्या रिमिक्स वर सिगारेट ओढत नाचत असल्याचे दिसून येत आहे. तर यामध्ये काही तृतीयपंथीदेखील असल्याचे दिसत आहे शिवाय डीजेच्या बाजूला पंचगंगा तालीम मंडळ Panchganga Talim Mandal शुक्रवार पेठ असे लिहिले असून या दोन्ही बाजूला छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराजांचे फोटो लावण्यात आले आहेत. नशा करत डीजेच्या तालावर धांगडधिंगा Intoxicated Dancing घालत, सिगरेट ओढणे आणि गोंधळ घालण्याच्या या प्रकारामुळे शिवप्रेमी आणि शाहूप्रेमींनी संताप व्यक्त केला असून यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी शिवशाहूप्रेमींकडून होत आहे हा व्हायरल व्हिडीओ कधीचा आहे हे अद्याप समजू शकले नाही