कंगनाचे कार्यालय कायदेशीर, त्यावरील कारवाई बेकायदेशीर - कंगनाचे वकील सिद्दीकी - कंगना रणौत लेटेस्ट न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - कंगनाचे कार्यालय हे कायदेशीर आहे. महापालिकेने केलेली कार्यवाही ही बेकायदेशीर असल्याची प्रतिक्रिया अभिनेत्री कंगना रणौतचे वकील रिजवान सिद्दीकी यांनी दिली आहे. कंगनाच्या घरात कोणत्याही प्रकारचे काम गेली 18 महिने सुरू नव्हते. महापालिका प्रशासनाने दिलेल्या नोटीसीचे चार तासात आम्ही उत्तर दिले, तरी कार्यवाही केली. आमच्या खासगी मालमत्तेचे महापालिकेने नुकसान केले. तसेच किती नुकसान झाले याची पडताळणी होत असल्याची माहिती कंगनाचे वकील रिजवान सिद्दीकी यांनी दिली.