Sharad Pawar About Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चेवर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले... - शरद पवार एकनाथ शिंदे सीएम न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली - एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्याने राज्यातील राजकारणारव काय परिणाम होतील याबाबत शरद पवार ( Sharad Pawar ) यांना विचारले असता. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद नको आहे. त्यासाठी त्यांची नाराजी नसल्याचे यावेळी पवार यांनी स्पष्ट केले. हा शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा आहे. त्यामुळे आम्ही यासंदर्भात अद्याप काही सांगु शकत नाही. आघाडीनुसार, शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद, राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्रीपद व कॉंग्रेसकडे इतर काही महत्त्वाची खाती असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.