Rohit Patil on Rebel MLA : पाठपुरावा केला तर कामे होतात - रोहित पाटील यांचा बंडखोर आमदारांना टोला - Rohit Patil on Shiv sena Rebel MLA
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - शिवसेनेचे बंडखोर आमदार ( Shiv sena Rebel MLA ) आणि मंत्री महा विकास आघाडी सरकारमधून बाहेर पडावे या मागणीसाठी सध्या बंड करून गोहाटी येथे वास्तव्यास आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला संकटात टाकल्यानंतर आमदारांनी अद्यापही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही, तर गेल्या अडीच वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या आमदारांना निधी दिला मात्र शिवसेनेच्या आमदारांना निधी दिला नाही, असा आरोप या आमदारांनी केला आहे. मात्र हा दावा चुकीचा असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि दिवंगत आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील ( NCP Leader Rohit Patil ) यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सर्वेसर्वा शरद पवार यांनी महा विकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी सर्व करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. शरद पवार यांचा अनुभव आणि यांची हातोटी सर्व महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला धोका नाही, असा विश्वासही रोहित पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. ( Rohit Patil on Shiv sena Rebel MLA )