Nagpur Ganesh Visarjan 2022 : नागपूरचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ, साधेपणाने निघाली मिरवणुक - नागपूरचा राजा विसर्जना मार्गस्थ

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 9, 2022, 2:02 PM IST

नागपूरात सुद्धा बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात Nagpur Ganesh Visarjan 2022 झाली आहे. दहा दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर, आज जड अंतःकरणाने गणरायाला निरोप दिला जातो आहे. नागपूरचा मानाचा गणपती समजला जाणाऱ्या, नागपूरचा राजा विसर्जनाकरीता मार्गस्थ झाला आहे. सोन्याच्या आभूषणांनी अलंकृत बाप्पांची मूर्ती भविकांचे लक्ष वेधून घेत होती. फक्त नागपूरचे नाही तर, विदर्भातील भक्त बापांच्या दर्शनाला येथे येतात. नागपूरचा राजाची मिरवणूक राजेशाही थाटात परंतु, अत्यंत साधेपणाने काढण्यात Nagpurcha Raja with simple procession आली होती. हजरो गणेशभक्त लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी एकत्र आले आहेत. नागपूर महानगरपालिकेने यावर्षी लावलेल्या नियमांच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या राजाची मूर्ती चार फुट उंच असली तरी, विसर्जन कोराडीच्या तलावात केले जाणार आहे. Ganesh Visarjan 2022

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.