Video : भिकारी दाम्पत्याने केला 'त्या' युवकाचा खून, मृतदेह आढळला होता भंगार कारच्या डिक्कीत - nagpur beggar couple murder young man
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - सात दिवसांपूर्वी नागपूर शहरातील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गार्डलाईन मध्ये उभी असलेल्या एका भंगार कारच्या डिक्कीत एका इसमाचा नग्न अवस्थेतील कुजलेला मृतदेह आढळून ( Body found in vehicle in Nagpur tehsil area ) आला होता. आरोपींनी त्या इसमाची हत्या करून मृतदेह कारच्या डिक्कीत लपवला असावा असा संशय पोलिसांना होता. त्या आधारे तहसील पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता अवघ्या तीन दिवसात मृतदेहाची ओळख पटवून आरोपींचा शोध देखील लागला आहे. मृतक हा कळमना निवासी कार्तिक हेमराज सेलोकर (37) असून त्याची हत्या एका भिकारी दाम्पत्याने क्षुल्लक कारणावरून केल्याचा खुलासा ( nagpur beggar couple murder young man ) झाला आहे. नासिर शेख वल्ड शफी (25) आणि नसरीन शेख या दोघांना अटक करण्यात आली आहे. कार्तिक पोटाच्या विकाराने त्रस्त होते. कार्तिक यांच्यावर (मेयो) इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरू असताना ते रुग्णालयातुन पळून गेले होते. त्यानंतर ते गार्डलाईन परिसरात भटकंती करत असताना एका भिकारी दाम्पत्यासोबत त्यांचा वाद झाला. क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणातून भिकारी दाम्पत्याने कार्तिकच्या डोक्यावर वार करून हत्या केली, त्यानंतर कुणालाही संशय येऊ नये यासाठी आरोपींनी मृतदेहावरील कपडे काढून मृतदेह एका भंगार कारच्या डिक्कीत टाकून पोबारा केला. मात्र पोलिसांनी अतिशय बारकाईने या प्रकरणाचा तपास करून आरोपींना हुडकून काढले आहे.
Last Updated : Apr 21, 2022, 9:52 PM IST