Mumbai Rain : पावसाचा आनंद लुटण्यासाठी मरीन ड्राइवर पर्यटकांची गर्दी - mumbai rain
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मुंबईसह महाराष्ट्रात सतत पडणाऱ्या पावसाने सामान्य लोकांचे जनजीवन विस्कळीत केले ( Mumbai Rain ) आहे. दुसरीकडे या पावसाचा आनंद लुटण्यासाठी मुंबईतील मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये पर्यटकांची गर्दी बघायला भेटत आहे. मागील तीन दिवसांपासून महाराष्ट्रसह मुंबईत बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचल्याने याचा परिणाम वाहतूक कोंडीवर होऊन नागरिकांना मोठा फटका बसला आहे. परंतु, हे सर्व होत असताना दुसरीकडे या पावसाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी, समुद्रात उसळणाऱ्या लाटांचे पाणी अंगावर घेण्यासाठी, मुंबई, महाराष्ट्रच नाही तर राज्याच्या बाहेरून आलेल्या पर्यटकांनी मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये गर्दी केली ( people enjoyed rain in huge numbers marine drive ) आहे.