Mumbai Ganpati Visarjan: मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना गणपती विसर्जन दरम्यान समुद्रात न जाण्याचे केले आवाहन - मुंबई गणपती विसर्जन
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - आज आनंत चतुर्थी Anant Chaturdashi 2022 दहा दिवसाच्या बाप्पाला निरोप दिला जाईल. या पार्श्वभूमीवर मुंबईतील दादर चौपाटी Ganpati immersion begins in Dadar Chowpatty area परिसरात आता गणपती विसर्जनाला Ganesha immersion begins in Mumbai सुरुवात झाली आहे. सकाळपासून इथे आतापर्यंत 18 गणपतींचे विसर्जन करण्यात आले आहे. मात्र, हा चौपाटी परिसर असल्याने इथे समुद्राचा धोका देखील तितकाच आहे. सध्या भरती सुरू असल्याने पालिकेकडून लोकांना समुद्रात न जाता इथल्या कर्मचाऱ्यांकडे गणपती सुपूर्त करण्याचे आवाहन केले जात आहे. अनेकदा भरती असताना अनेक भक्तगण आपला गणपती घेऊन समुद्रात विसर्जनासाठी जातात. त्यात पाण्याचा अंदाज न आल्याने काही वेळा अपघात देखील होतो. त्यामुळे आता पालिकेने तब्बल दहा गार्ड इथे तैनात केले असून त्यांना सहकार्य करण्याच आवाहन पालिकेकडून जनतेला केले जात आहे.
Last Updated : Sep 9, 2022, 6:05 PM IST