Achalpur Paratwada Violence : खासदार नवनीत राणा यांनी जिल्हावासियांना केले शांततेचे आवाहन - शांततेचे खासदार नवनीत राणा यांचे नागरिकांना आवाहन
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - जिल्ह्यातील अचलपूर शहरात (Achalpur Violence) रविवारी रात्री दोन गटात तणाव निर्माण होऊन दगडफेक झाल्यामुळे खळबळ उडाली होती. या घटनेमुळे अचलपूर, परतवाडा येथे संचारबंदी घोषित करण्यात आली. या पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी जिल्हावासियांनी शांतता राखावी, कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. खासदार नवनीत राणा मंगळवारी अचलपूरचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन नेमकी वस्तुस्थिती खासदार नवनीत राणा जाणून घेणार आहेत. जिल्ह्यात सामाजिक शांतता राहावी यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, सर्व धर्मीय बांधवांनी जिल्ह्यात कुठेही तणाव निर्माण होणार नाही याबाबत दक्षता बाळगावी, असेही खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे.