Jignesh Mevani : गोडसेचे भक्त म्हणाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिरची झोंबली.. आमदार जिग्नेश मेवाणींची टीका
🎬 Watch Now: Feature Video
गुवाहाटी ( आसाम ) : बारपेटा येथील सत्र न्यायाधीशांच्या न्यायालयात जामीन मिळाल्यानंतर आमदार जिग्नेश मेवाणी यांनी आपली प्रतिक्रिया दिली. गोडसेचे भक्त म्हणाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिरची झोंबली, अशा शब्दात जिग्नेश मेवानी यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसवर जोरदार हल्ला ( Jignesh Mevani Criticized PM Modi ) चढवला. तसेच पुष्पा चित्रपटातील डायलॉग 'झुकेगा नहीं', म्हणत त्यांनी आगामी काळात मोदी सरकारविरोधात आक्रमक होण्याचे संकेत ( Jignesh Mevani Aggresive Against BJP ) दिले. जिग्नेश मेवाणीच्या जामिनावर गुरुवारी सुनावणी झाली मात्र न्यायालयाने या निकालाला स्थगिती देत पोलिसांकडून केस डायरीची मागणी केली. न्यायमूर्ती अपरेश चक्रवर्ती यांच्या कोर्टाने आज अखेर जिग्नेश मेवाणीला जामीन मंजूर केला. न्यायालयाने जिग्नेश मेवाणीला 1000 रुपयांच्या पीआर जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. बारपेटा रोड पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या बारपेटा सदर पोलिस ठाण्यात पाच दिवसांच्या पोलिस कोठडी असताना न्यायालयाने आज जिग्नेश मेवाणीला हा जामीन मंजूर केला. गुजरातमधील काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवाणी ( Congress MLA Jignesh Mevani ) यांना जामीन मंजूर करण्यात आला ( Bail Granted To Jignesh Mevani ) आहे. आसाम पोलिसांनी अटक ( Assam Police Arrested Jignesh Mevani ) केल्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता.