Man Died While Walking : एमपीच्या झाबुआमध्ये रस्त्याने चालत असताना अचानक एका व्यक्तीचा मृत्यू, पाहा CCTV Video - Man Died While Walking

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jun 16, 2022, 3:26 PM IST

झाबुआ (मध्यप्रदेश) - झाबुआ जिल्ह्यात रस्त्याने चालत असताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ हा CCTV मध्ये कैद झाला आहे. मृत्यूचा हा लाईव्ह व्हिडिओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. ही घटना झाबुआ शहरातील वॉर्ड क्रमांक ७ मधील कुंभार वस्तीत झाली. सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत आहेत, मात्र प्रथमदर्शनी पाहता या व्यक्तीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. रस्त्याने चालताना मृत्यू झालेल्या व्यक्तीचे बडा सेमालिया असे नाव आहे. घटनेनंतर ४ तास मृतदेह रस्त्यावर पडून होता. कोणतीही हालचाल न दिसल्याने रहिवाशांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेला. तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृताच्या पत्नीने सांगितले की, "पती सकाळी ७.०० वाजता घरातून निघून गेला होता. गावात घराचे बांधकाम सुरू होते, त्यासाठी तो झाबुआकडे वाळू गोळा करण्यासाठी केला होता. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, हा प्रथमदर्शनी हार्ट अटॅकचा प्रकार असो शकतो. ( Jhabua Man Death While Walking )

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.