ठाणे जिल्ह्यात मुसळधार.. मुंब्रा-शिळ ते पनवेल हायवे वाहतुकीसाठी बंद - ठाणे जिल्ह्यात मुसळधार
🎬 Watch Now: Feature Video
पावसाचा जोर वाढल्याने मुंब्रा पनवेल-हायवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुंब्रा, शिळफाटा परिसरात पावसाचा जोर वाढतच चालल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर आले आहे. शिळफाटा ते नेक्सट वर्ल्ड बिल्डिंग ते खान कम्पाउंड हा भाग पुर्णत: पाण्याखाली गेल्यास नागरिकांनी अनावश्यक कारणासाठी घराबाहेर पडू नये, असे आवाहन ठाणे पोलिसांनी नागरिकांना केले आहे.मुंब्रा, शिळफाटा व पारसिक डोंगररांग इथं चालू मुसळधार पावसामुळे मुंब्रा पनवेल हायवे वर पाण्याचा प्रवाह आलाय. गेले तीन दिवस पडत असलेल्या जोरदार पावसामुळे शिळरोड पुर्णत: पाण्याखाली गेला आहे. यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी पहायला मिळतेय. आता रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने या परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे.