समाजाविरुद्ध पोस्ट केल्या तर तुमचाही कन्हैयालाल करु; गाझियाबादमध्ये व्यापारी नेत्याला धमकी - Ghaziabad businessman threatened to be killed by speed post like Kanhaiyya Lal
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली/गाजियाबाद - जिल्ह्यातील व्यापारी नेते देवेंद्र ढाका यांना तुमाचा कन्हैयालाल करू अशी धमकी मिळाली आहे. त्यावर ढाका यांनी आपल्याला धमकी मिळाल्याची तक्रार दिली. त्यानंतर प्रशासनाने व्यापारी नेत्याला सुरक्षा पुरवली आहे. ढाका यांना धमकी मिळाल्यानंतर त्यांनी या गोष्टीचाही मोठा धसका घेतला आहे. दरम्यान, ढाका यांना धमकीचे पत्र स्पीड पोस्टद्वारे मिळाले आहे. या पत्रात जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. प्रकरण गाझियाबादच्या लोणी भागातील आहे. येथे राहणारे व्यापारी नेते देवेंद्र ढाका यांनी स्पीड पोस्टवरून पत्र आल्याचे सांगितले आहे. एका समाजाविरोधात सतत पोस्ट केल्याबद्दल देवेंद्र ढाका यांना शिक्षा होईल आणि त्यांची अवस्थाही कन्हैयालालसारखी केली जाईल, असे या पत्रात लिहिले आहे. तसेच, ढाका यांच्या मुलालाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.