Ganesh Chaturthi 2022: गणपतीला दुर्वा का वाहतात, जाणून घ्या धर्मशास्त्रानुसार कारण - Durva Is Important For Ganpati
🎬 Watch Now: Feature Video
नांदेड हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्वच कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा Ganesh Chaturthi Puja करतात. गणपती विघ्नहर्ता आहे. गणपतीला दुर्वांची जुडी वाहतात.Durvas are offered to Ganapati यामुळे गणपती प्रसन्न होतो. गणपतीला दुर्वा खूपच प्रिय Lord Ganapati loves Durva आहेत. एकवीस दुर्वांची मिळून केलेली जुडी गणपतीला अर्पण केली जाते.गणपतीच्या डोक्यावर दुर्वा वाहतात यामागे एक आख्यायिका आहे. ऋषी मुनी आणि देवता यांना अनलासूर नावाच्या राक्षसाने त्रास द्यायला सुरुवात केली होती. अनल अर्थात अग्नी. देवतांच्या विनंतीनंतर गणेशजींनी त्या असूराला गिळून टाकले. यामुळे गणेशाच्या पोटात जळजळ होऊ लागली. तेव्हा ८८ सहस्त्र मुनींनी प्रत्येकी २१ अशा हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या. आणि कश्यप ऋषींनी दुर्वांच्या २१ जुडी गणेशाला खाण्यास दिली. त्यावेली अथक प्रयत्नानंतरही गणेशाच्या पोटातली न थांबलेली जळजळ कमी झाली. त्यावेळी, यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ, व्रते, दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल, असे गणराय म्हणाले होते. म्हणून गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात. तसेच दुर्वा ही एक औषधी वनस्पती Durva is a medicinal plant आहे. पोटात जळजळ आणि इतर विकारांसाठी दुर्वा औषधी आहे. मानसिक शांतीसाठीही दुर्वा लाभकारक आहे. कर्करोगाच्या रुग्णांवरही दुर्वा लाभप्रद असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे.
Last Updated : Aug 31, 2022, 11:26 AM IST