Burning Car in Nashik - तारवाला नगर परिसरात चालत्या गाडीने घेतला अचानक पेट - पंचवटी
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक - पंचवटीतील तारवाला नगर येथील सिग्नलजवळ धावत्या चारचाकी वाहनाने पेट घेतल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नसून वाहन सुमारे 80 टक्के जळून खाक ( Burning Car in Nashik ) झाली आहे. मखमलाबाद येथील रामदास तुकाराम काकड हे आपल्या वाहनातून (एमएच 15 इएफ 9164) पंचवटीहून घरी परतत होते. त्यावेळी तारवाला नगर येथे त्यांच्या वाहनाने अचानक पेट घेतला. वाहनाने पेट घेताच काकड हे वाहनाच्या खाली उतरले इतक्यात एकाने अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाने आगीवन नियंत्रण मिळवले. तोपर्यंत वाहन 80 टक्के जळाले होते. काकड यांनी वेळीच वाहनातून उडी मारल्याने सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही.