Rajyasabha Election Result : 'राज्यसभा तो झाकी है, विधानपरिषद अभी बाकी है', विजयानंतर धनंजय महाडिकांची पहिली प्रतिक्रिया
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - भारतीय जनता पक्षाने अतिशय चांगल्या पद्धतीने रणनीती आखात राज्यसभेच्या तीनही जागा जिंकल्या आहेत. आमच्याकडे पुरेसे संख्याबळ नाही, असा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आम्ही धोबीपछाड दिला आहे, अशी प्रतिक्रिया राज्यसभेचे नवनियुक्त खासदार धनंजय महाडिक यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केले. कोल्हापूरचे भाजपचे नवनियुक्त राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरात आता भाजपची ताकद वाढली असून आमचा महाडिक गट अधिक प्रभाव झाल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.