daughter in law beat mother in law इन्स्पेक्टर सुनेची सासुला बेदम मारहाण, राजधानी दिल्लीती घटना - सासू सुनेतील वाद विकोपाला
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली : सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये पोलिसांच्या उपस्थितीत एक महिला एका वृद्ध जोडप्याला मारहाण करताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओबाबत दावा केला जात आहे की, ही महिला दिल्ली पोलिसात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. या इन्स्पेक्टर सुनेना सासूला बेदम मारहाण केली daughter in law beat mother in law. हा व्हिडिओ पूर्व दिल्लीतील लक्ष्मी नगर भागातील आहे. लक्ष्मीनगरच्या गढवाली मोहल्लामध्ये ६६ वर्षीय विजेंदर गुप्ता त्याची ६२ वर्षीय पत्नी वीणासोबत राहतात. विजेंदर गुप्ता यांची सून चंचल या डिफेन्स कॉलनी पोलिस ठाण्यात दिल्ली पोलिसात एसआय पदावर कार्यरत आहेत. तिचे पती अंकुर हे इंडिया पोस्टच्या पेमेंट बँकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांची पोस्टिंग रेवाडी, हरियाणा येथे आहे. रविवारी सकाळी चंचल आईसह सासरच्या घरी आली आणि तिने सासुला मारहाण केली. सासू सुनेतील वाद विकोपाला गेल्यानंतर वृद्ध दाम्पत्याने पोलिसांना फोन करून या प्रकरणाची माहिती दिली.