Threats To Deepali Sayyad : 'मला जीवे मारण्याची धमकी, ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार करणार' - दीपाली सय्यद - Oshiwara Police Station

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jun 1, 2022, 5:00 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपाच्या नेत्यांकडून सातत्याने टीका केली जाते. पंतप्रधानांवर भाष्य करत शिवसेना नेत्या दीपाली सय्यद ( Shiv Sena leader Deepali Sayyed ) टीकाकारांना सडेतोड उत्तर देत आहेत. आताही अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, मुख्यमंत्र्यांवर टीका केली तर पंतप्रधानांच्या आठवण करून देऊ, असा थेट इशाराच सय्यद यांनी भाजपाला ( BJP ) दिला होता. त्यानंतर दीपाली सय्यद म्हणाल्या की, मला घरात घुसून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या ( Deepali Sayyad threatened to kill ) आहेत. त्यामुळे मला धमक्या देणाऱ्यांविरोधात मी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार करणार आहे, असे त्या म्हणाल्या.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.