Rebel MLA Suspension Process : ... तर ते बंडखोर आमदार निलंबित होऊ शकतात - घटनातज्ज्ञ उल्हास बापट
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Shivsena rebel leader Eknath Shinde ) यांनी आणि त्यांच्याबरोबर असलेल्या आमदारांनी बंड केल्यानंतर राजकीय राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. महाराष्ट्रात निर्माण झालेला परिस्थितीमुळे शिवसेनेने 16 जणांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली होती. विधानसभा उपाध्यक्षांकडून 16 बंडखोर आमदारांना नोटीस पाठविण्यात आली आहे, असं सांगितलं जातं आहे. यात एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना येत्या 48 उत्तर देण्याचे सांगितले आहे. जर हे 16 आमदार 48 तासात आले नाही तर उपाध्यक्ष या आमदारांना निलंबित करू शकतात. तो त्यांचा अधिकार आहे, असं घटनातज्ञ उल्हास बापट यांनी म्हटलं आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती आणि कायदेशीर बाबी यावर आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद याने बातचीत केलीय घटनातज्ञ उल्हास बापट ( Ulhas Bapat ) यांच्याशी पाहूया.