VIDEO : ज्योतिरादित्य सिंधियासह महाराष्ट्रातील चार खासदारांचा शपथविधी सोहळा - मोदी कॅबिनेट विस्तार
🎬 Watch Now: Feature Video
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आज पार पडला. एकूण १२ विद्यमान मंत्र्यांनी राजीनामे दिले त्यासोबतच एकूण ४३ मंत्र्यांचा आज शपथविधी सोहळा पार पडला. यामध्ये महाराष्ट्रातील ४ खासदारांचा समावेश आहे. त्यात नारायण राणे, डॉ. भारती पवार, डॉ. कपिल पाटील आणि डॉ. भागवत कराड यांचा समावेश आहे. मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसमध्ये बंडखोरी करून भाजपला सत्तेपर्यंत पोहोचवणारे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
Last Updated : Jul 8, 2021, 1:36 AM IST