Amarnath Yatra Devotees Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या बसचा अपघात; 14 जण जखमी - Amarnath Yatra Devotees Bus Accident
🎬 Watch Now: Feature Video
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील काझीगुंडमध्ये अमरनाथ यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसला गुरुवारी अपघात ( Amarnath Yatra Devotees Bus Accident ) झाला. अपघातात जखमी झालेल्या काही प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात 14 प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी 2 गंभीर जखमींना GMC अनंतनाग येथे हलवण्यात आले आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, 40 यात्रेकरूना घेऊन ही बस बालटाल बेस कॅम्पला जात होती. राष्ट्रीय महामार्गावर काझीगुंड येथील नुसू बदेरगुंडजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यानंतर बस त्याच दिशेने जाणाऱ्या डंपरला धडकली. या अपघातात 14 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.