Building Collapsed in Shimla : शिमल्यात संततधार पाऊस, 4 मजली इमारत कोसळली - चौपाल बाजार इमारत कोसळली
🎬 Watch Now: Feature Video
शिमला ( हिमाचल प्रदेश ) - शिमला जिल्ह्यातील चौपाल बाजार येथे 4 मजली इमारत कोसळली ( Building collapsed in shimla ) आहे. संततधार पावसानंतर दरड कोसळल्याने ( Landslide in Himachal ) इमारत कोसळली. या इमारतीत एक ढाबा, दोन दुकाने आणि बँक असल्याचे सांगितले जात आहे. संततधार पावसामुळे जमीन खचल्याने हा अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हिमाचलमध्ये मान्सून ( Himachal weather update ) सुरू होताच नुकसानीचा कालावधीही सुरू झाला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर, दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. यापूर्वीही कुल्लू ते बिलासपूरपर्यंत ढगफुटीच्या घटना समोर आल्या आहेत. ज्यामुळे खूप नुकसान झाले आहे. या पावसाळ्यात आतापर्यंत 90 कोटींहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.