Video : आमदार अमोल मिटकरी यांच्या 'त्या' विधानाविरोधात ब्राह्मण समाजाचा भव्य मोर्चा - आमदार अमोल मिटकरी
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक - ब्राह्मण समाजाबाबत आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या वादग्रस्त विधाना विरोधात नाशिकमध्ये ब्राह्मण महासंघातर्फे मोर्चा काढण्यात ( Brahmin community march against MLA Amol Mitkari ) आला होता. यावेळी अमोल मिटकरी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काही दिवसांपूर्वी लग्नाचा विधी, कन्यादान या विषयी अमोल मिटकरी यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे ब्राह्मण समाजामध्ये रोष निर्माण झाला आहे. यातूनच अमोल मिटकर यांच्या विरोधात नाशिकमध्ये महामोर्चा काढण्यात येऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शहरातील बी. डी. भालेकर मैदानावरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात होता. या मोर्चात राज्यभरातून ब्राह्मण समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते भगवे झेंडे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या निषेधाचे फलक घेऊन सहभागी झाले होते. या मोर्चात महिलांही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मिटकरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा यासाठी जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.