VIDEO : टोल प्लाझावर भीषण अपघात, दुचाकीस्वाराने महिलेला धडकले, 50 मीटरपर्यंत नेले - टोकनाक्यावरील अपघात
🎬 Watch Now: Feature Video
डेहराडून (उत्तराखंड) - डेहराडून येथील डोईवाला टोल प्लाझा येथे आठवडाभरात दुसरी दुर्घटना घडली ( accident in doiwala toll plaza ) आहे. याआधी येथे ट्रक टोल केबिनमध्ये घुसला होता. आता त्याच टोलनाक्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने एका टोल महिला कर्मचाऱ्याला धडक दिली ( bike hit toll lady worker ) आहे. बुधवारी दुपारी ही घटना घडली. टक्कर एवढी भीषण होती की, धडकल्यानंतर दुचाकीस्वाराने महिला कर्मचाऱ्याला ५० मीटरपर्यंत ओढून नेले. जखमी महिलेला हिमालयन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिलेच्या उजव्या पायात तीन फ्रॅक्चर झाले असून डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.