Asaduddin Owaisi attend Iftar party : खासदार जलील यांच्या इफ्तार पार्टीला असदुद्दीन ओवैसींची हजेरी - इफ्तार पार्टीला असदुद्दीन ओवैसींची हजेरी
🎬 Watch Now: Feature Video
औरंगाबाद - एमआयएम अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel Iftar Party) यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला (Iftar Party in Aurangabad) हजेरी लावली. सिडको ऐन 12 भागात जलील यांच्या निवासस्थानी सायंकाळी ही इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये खासदार ओवैसी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी तसेच नागरिकांशी चर्चा केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Aurangabad Sabha) शहरात दाखल झाले आहेत. त्यात अचानक ओवैसी यांच्या येण्याने चर्चांना उधाण आले आहे. ओवैसी यांच्या दौऱ्याबाबत माहिती देण्यात आलेली नव्हती. तसेच शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांचेदेखील शहरात आगमन झाले आहे. त्यामुळे शहरात राजकीय पक्षांच्या नेत्यांमुळे सभेच्या आधीच अनेक चर्चा रंगताना दिसत आहेत.